रक्तदान ही सुद्धा एक समाजसेवा : प्रमोद कामत

Edited by: विनायक गांवस
Published on: June 23, 2024 13:57 PM
views 40  views

सावंतवाडी : गोवा टुडे मीडिया आणि शिव वॉरियर्स युनायटेड टॅक्सी ब्रदर मोपा याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित रक्तदान शिबिर नाना शेठ हॉल नागझर येथे आयोजित करण्यात आले होते.  या शिबिरात 50 पेक्षा जास्त युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 "रक्तदानासारखी समाजसेवक सर्वांनी करावी आणि दोन्ही  आयोजक संस्थांनी असेच समाजकार्यात पुढे यावे" असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमोद कामत यांनी केले.  यावेळी व्यासपीठावर युवा पंच प्रजय मलीक, प्रताप भेनडालकर, शिव टॅक्सी वॉरियरचे अध्यक्ष रामा वारंग, गोवा मेडिकलचे डॉक्टर संजय आणि  कार्यक्रमाचे प्रमुख प्रमोद कामत उपस्थित होते. हिंदू संस्कृती प्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पाहुण्याचे स्वागत महादेव गवस आणि नरेश गवस आणि क्ली फड यांनी केले. गोवा मेडिकलचे डॉक्टर संजय, यांच्या मते या शिबिराला खूपच चांगला प्रतिसाद होता. युवकांमधे रक्तदाना विषयी  जागरूकता निर्माण झाली पाहिजे.  या शिबिरात युवक, युवती  व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संखेने  सहभागी झाले होते. कार्यक्रमात सहभागी  झालेल्यांचे आभार निकीत गवस यांनी मानले. .