तब्बल ४२ रक्तदात्यांकडून रक्तदान !

वेंगुर्ला-अणसुर येथे रक्तदान शिबीर
Edited by: दिपेश परब
Published on: December 27, 2023 13:05 PM
views 142  views

वेंगुर्ला : श्री देव काळोबा प्रासादिक मंडळ व ग्रामस्थ अणसुर आणि ग्रामपंचायत अणसुर यांच्या माध्यमातून व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा वेंगुर्ला यांच्या सहकार्याने रविवार २४ डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण प्राथमिक शाळा अणसुर-वरचे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन अणसुर गावचे सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच सौ मालवणकर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे गोवा जीएमसी ब्लड बँक समन्वयक संजय पिळणकर आदींच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उपाध्यक्ष महेश राऊळ, वेंगुर्ला कार्यकारिणी उपाध्यक्ष समृद्धी पिळणकर, प्राध्यापक सचिन परुळेकर, डॉ अभिजित वनकुद्रे, अणसुर ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पवार, नितीन लिंगोजी, प्रकाश गावडे, तुकाराम गावडे,आनंद गावडे, हरिश्चंद्र गावडे, ग्रामस्थ प्रकाश गावडे, चंदू गावडे, बिटू गावडे, देऊ गावडे, प्रभाकर गावडे, विजय गावडे, श्री देव काळोबा प्रासादिक मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासाहित मंगेश गावडे, सिद्धेश गावडे, संदेश गावडे, राकेश गावडे, नीळकंठ गावडे, नितीन गावडे, बाबुराव गावडे, निलेश गावडे, किशोर गावडे, वैभव गावडे, विशाल गावडे, रोहन गावडे, ओंकार गावडे, अतुल गावडे आदी उपस्थित होते. 

यावेळी गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात एकूण ४२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे गोवा जीएमसी ब्लड बँक समन्वयक संजय पिळणकर यांनी अणसुर सारख्या ग्रामीण भागातील तरुण व गावचे सरपंच रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासतात हे कौतुकास्पद आहे. तसेच याच गावचा तरुण रक्तदाता कृष्णा गावडे यांनी तब्बल ३६ वेळा रक्तदान करून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला. त्याचेही कौतुक करून तो अणसुर गावचा भूषण असल्याचे म्हटले.