
दोडामार्ग : “रक्तदान हेच महादान” या सामाजिक संदेशाला मूर्त स्वरूप देत अष्टविनायक मित्रमंडळ तळकट कट्टा, तळकट ग्रामपंचायत आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान (शाखा दोडामार्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ऑक्टोबर रोजी तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंधारे आणि डॉ. राणे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, सरपंच सुरेंद्र सावंत, उपसरपंच रमाकांत गवस, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे डॉ. बाळासाहेब नाईक, तसेच प्रतिष्ठानचे दोडामार्ग शाखा अध्यक्ष भुषण सावंत, निवृत्त मुख्याध्यापक दुर्गाराम गवस यांच्या उपस्थितीत झाले.
या शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर एकूण ४५ जणांनी रक्तदानासाठी नोंदणी केली होती. मात्र काही महिलांचे हिमोग्लोबिन प्रमाण कमी असल्याने आणि काही तांत्रिक कारणांमुळे सर्वांना रक्तदान करता आले नाही.
शिबिरात रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन चाचणी देखील करण्यात आली. प्रकाश तेंडुलकर आणि डॉ. बाळासाहेब नाईक यांनी रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगत समाजातील तरुणांना नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले.
या शिबिरात जुने आणि नवे रक्तदाते उत्साहाने सहभागी झाले. विठ्ठल आनंद गवस (११ वेळा), निलेश वसंत धुरी (९), गोविंद नारायण देसाई (८), गोविंद वामन गवस (७), सगुण नाटेकर (६), सुरेंद्र सावंत भोसले (६) आदी अनुभवी रक्तदात्यांसोबत अनेक नवीन रक्तदात्यांचा सहभाग विशेष ठरला.
नवीन रक्तदात्यांमध्ये अवधूत वेटे, विकास सावंत, नारायण राऊळ, अरुण अभ्यंकर, मानस राऊळ, राहुल देसाई, मिलिंद नांगरे, सुमित मळीक, दशरथ शिंदे, दीपेश राऊळ, दत्तप्रसाद राऊळ आणि धनश्री राऊळ यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
कार्यक्रमाला एम. डी. धुरी, विजयकुमार मराठे, विठ्ठल (बाबा) देसाई, दत्ता जोशी, एकनाथ गवस, सुरेश काळे, अमोघ सिद्धे, भिकाजी जोशी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी भेट देऊन प्रोत्साहन दिले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेंद्र सावंत, गोविंद (तात्या) देसाई, मनोहर सावंत, दत्तप्रसाद सावंत, रमेश शिंदे, प्रज्योत देसाई, संदीप वेटे, बाळू राणे, पप्पू नाईक, सगुण नाटेकर, शिवप्रसाद नाटेकर, शशिकांत राऊळ, विवेक मळीक, चंद्रहास राऊळ, बाबल गवस आणि तळकट कट्टा युवा वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
आरोग्य कर्मचारी आशा संजना नांगरे, अंगणवाडी शिक्षिका दिव्या देसाई आणि प्रणाली प्रभाकर देसाई यांनीही महत्त्वाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रमेश शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोविंद गवस यांनी मानले.
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित हे रक्तदान शिबिर खऱ्या अर्थाने जीवनदायी दीपोत्सव ठरले.