
सिंधुदुर्ग : सिंधुनगरी ऑटो रिक्षा चालक मालक सेवा संघाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात रक्त दात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सिंधुनगरी ऑटो रिक्षा चालक मालक सेवा संघाच्या वतीने आज ओरोस फाटा येथील डॉ प्रवीण सावंत दवाखाना येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता रामानंदा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी मनीष कोल्हटकर, सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शारबीद्रे, सचिव सुधीर पराडकर, रिक्षा युनियनचे ठाणे विभागीय कार्याध्यक्ष संतोष नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुनगरी ऑटो रिक्षा चालक मालक सेवा संघाचे अध्यक्ष नागेश ओरोसकर, उपाध्यक्ष अंकुश पारकर, सचिव प्रवीण शिरसाट, खजिनदार सतीश सावंत आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात एकूण ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.