
सावंतवाडी : शिवप्रेमी मित्रमंडळ,आजगाव- धाकोरे आयोजित शिवजयंती सोहळा कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा आजगाव नं.१ येथे रविवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते १ वाजेपर्यत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शिवप्रेमी मित्रमंडळाने केले आहे.