सावंतवाडी : जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सावंतवाडीत रक्तदान महायज्ञाने आयोजन करण्यात आलंय. 16 जानेवारीला हे रक्तदान शिबीर होतंय. सावंतवाडीतील काझी शहाबुद्धीन हॉल इथं हे शिबीर होणार आहे. यानिमित्ताने रक्तदात्यांना उपस्थित राहाण्याचं आवाहन करण्यात आलंय.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या माध्यमातून नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात वाढत चाललेली रक्ताची रक्ताची गरज ओळखून हा खास उपक्रम हाती घेण्यात आला. मागच्या अनेक वर्षांपासून अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात येत. शिवाय महाराष्ट्रातच सिकलसेल अनेमिया, हिमोफिलिया, थलेसेमिआ, ब्लड कन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची गरज भासते. अशांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्यांचा पुरवठा करण्यासाठी संप्रदायाने हे पाऊल उचललंय. 16 जानेवारीला काझी शहाबुद्धीन हॉल इथं सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हे रक्तदान महायज्ञ होणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचं आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने करण्यात आलंय.