शिवप्रेमी मित्र मंडळ आरवली टांक यांच्यावतीने रक्तदान शिबीर

शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजन
Edited by: ब्युरो
Published on: January 11, 2025 20:11 PM
views 20  views

वेंगुर्ला :  शिवप्रेमी मित्र मंडळ आरवली टांक यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आले आहे. शिवजन्मोत्सवाच्यानिमित्ताने असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदाचं हे तिसरं वर्ष आहे. 

सोमवारी 17 फेब्रुवारीला या शिबीराचं आयोजन करण्यात आले आहे. मारुती मंदिर टांक इथं सकाळी 9 ते 1 या वेळेत रक्तदान शिबीर होणार आहे. आरवली टांक शिवप्रेमी मित्र मंडळाच्यावतीने शिवजन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो. गेल्या 4 वर्षांपासून हे मंडळ विविध कार्यक्रम राबवत याचंच औचित्य साधत हे मंडळ सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. इच्छुक रक्तदात्यांनी 7588958080 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन शिवप्रेमी मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.