बाळू माने मित्रमंडळ MHO7ची सामाजिक बांधिलकी !

Edited by: साहिल बागवे
Published on: August 01, 2024 15:00 PM
views 129  views

कणकवली : बाळू माने मित्रमंडळ MHO7 ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 31 जुलैला कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात हे शिबीर पार पडलं. शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 67 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजकारणामध्ये अग्रेसरपणे भाग घेऊन सर्वसामान्य जनतेच्या गरजा ओळखून अशा उपक्रमांना या ग्रुपने सुरुवात केली. त्यासाठी ग्रुप मधल्या सदस्यांचा उस्फूर्तपणे पाठिंबा मिळाला. या रक्तदान शिबिरामध्ये नेपाळ मधील सुजन घीमिरे यांनीही रक्तदान केले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून एक नवीन चळवळ उभी होतेय. त्यामाध्यमातून नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. एका महिन्यापूर्वी मुलीला आर्थिक मदतीची गरज होती ती उभी करून गोवा बांबुळी  हॉस्पिटलमध्ये नेऊन देण्यात आली  होती. अशा वेगवेगळ्या उपक्रमामुळे बाळू माने मित्र मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  यावेळी बाळू माने यांनी सर्व रक्तदाते यांचे आभार मानले आहेत.