रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर..!

Edited by:
Published on: February 02, 2024 08:43 AM
views 71  views

सिंधुदुर्ग : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत एस एस पी एम मेडिकल कॉलेज & लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या  शिबिरामध्ये एकूण 19 रक्तदात्यांनी रक्तदान केले.  व उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

या शिबिराचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथील सर्व मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, कार्यालयीन कर्मचारी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, तसेच डॉक्टर सुमित कांबळे व त्यांची टीम मार्फत करण्यात आले.