युवा रक्तदाता संघटनेकडून उद्या रक्तदान शिबीर..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 15, 2023 13:31 PM
views 179  views

सावंतावडी : युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून उद्या शनिवार दि. १६ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराच आयोजन करण्यात आले आहे. सावंतावडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी मध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आल आहे. सकाळी १० वाजल्यापासून या शिबिरास प्रारंभ होणार आहे.

याप्रसंगी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदाना सारख्या महानकार्यात सहभागी व्हावं असं आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री.देव्या सुर्याजी यांनी केले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या शिबिराच आयोजन करण्यात आले आहे.