नितेश राणेंच्या वाढदिनी रक्तदान शिबिराचं आयोजन..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 20, 2023 13:50 PM
views 127  views

कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून रक्तदात्यांसाठी खास लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये 23 जून रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे.

माजी नगराध्यक्ष समीर नलावडें च्या संकल्पनेतून रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉ असणारे हे आगळेवेगळे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यासाठी प्रायोजक असून लकी ड्रॉ प्रथम विजेत्या रक्तदात्याला वॉशिंग मशीन, द्वितीय विजेत्याला ओव्हन, तृतीय विजेत्याला गॅस शेगडी भेट देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा कणकवली शहर प्रमुख अण्णा कोदे यांनी केले आहे.