
सावंतवाडी : पोलीस स्थापनादिनाच्या अनुषंगाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांतर्गत महिला पोलिस अंमलदार पोलीस कुटुंबीय तसेच इतर महिला ग्रुप करता खेळ पैठणीचा हा स्पर्धात्मक उपक्रम महिलांच्या मनोरंजनाकरता राबवण्यात आला. तसेच रोटरी क्लब सावंतवाडी व युवा रक्तदाता संघटना, ऑन कॉल ब्लड ग्रुप यांच्या सहकार्याने सकाळी 10 ते दुपारी 1.30 दरम्यान रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यामध्ये पोलीस अधिकारी अंमलदार तसेच विविध नागरिक अशा 40 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला आहे. या शिबिराचे उद्घाटन उप विभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विनोद कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास सेवानिवृत्त डी.वाय. एस.पी. दयानंद गवस, नगरसेवक देव्या सूर्याजी, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण तसेच कुडाळ ,वेंगुर्ला, निवती, दोडामार्ग, बांदा पोलीस ठाण्याचे अधिकारी व सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.










