समाज मंदिरमध्ये 10 एप्रिलला रक्तदान शिबिर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य
Edited by: विनायक गांवस
Published on: April 08, 2025 17:20 PM
views 153  views

सावंतवाडी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे येथील बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीच्यावतीने गुरुवारी 10 एप्रिल रोजी समाज मंदिर मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण  उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर अहिवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत  सकाळी नऊ वाजता होणार आहे. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समन्वय समिती ने केले आहे.