नारिंग्रेत रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 08, 2025 17:40 PM
views 216  views

देवगड : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील गांगेश्वर मंदिर मध्ये पार पडलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. मिशन सिंधू रक्तक्रांती २०२५-२०३० अंतर्गत हा रक्तदान उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एकूण शिबिरात ४६ दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजासाठी जीवनदानाचा मौल्यवान संदेश दिला. प्रत्येक दात्याचे योगदान अमूल्य आहे — प्रत्येक थेंब एखाद्या जीवाला नवजीवन देऊ शकतो. हा संदेश दिला यामध्ये महिलांनी देखील रक्तदान केले यामध्ये 6 महिलांनी रक्तदान शिबिराचा लाभ घेऊन रक्तदान केले. महिलांनी रक्तदान करून समाजाला खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली या रक्तदात्यांमध्ये दर्शना राणे,नीलाक्षी राणे, क्षमा अभ्यंकर, दीक्षा तेली, प्रीती पटाडे, ममता साठे या स्त्री शक्ती केवळ घर, शिक्षण किंवा समाजातच नाही, तर जीवनदानाच्या या सेवाभावी आंदोलनातही अग्रेसर होऊन रक्तदान केले. O-Negative डोनर: 1O-Negative हे युनिव्हर्सल डोनेटिंग रक्तगट असून आपत्कालीन परिस्थितीत सर्वाधिक महत्वाचे आणि अवघड मिळणारे रक्त असते. या दुर्मिळ रक्तगटाचा दाता  कृष्ण वामन कोयंडे यांनी एकाच संपर्कावर त्वरित उपस्थित राहून अनमोल एकदम शिबिराचा लाभ घेऊन रक्तदान केले.A-Negative डोनर: 1 A-Negative हा देखील दुर्मिळ रक्तगटांपैकी एक आहे. प्रशांत हलदनकर यांनी आज रक्तदान करून भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्याची अमूल्य निर्मिती करून दिली.

त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरते.तसेच या ठिकाणी साकारण्यात असलेली सेल्फी पॉईंट विशेष लक्षवेधी आणि उत्साहवर्धक ठरला या शिबिरात मिशन सिंधू रक्तक्रांती अंतर्गत प्रथमच स्थापन केलेल्या सेल्फी पॉईंटला विलक्षण प्रतिसाद मिळाला.रक्तदानानंतर दात्यांना त्यांच्या रक्तदाता बॅजेस सह सेल्फी घेण्याची संधी देण्यात आली,आणि हा अनुभव सर्वांसाठी गौरवाचा क्षण ठरला.

रक्तदानानंतर दात्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान, आनंद आणि समाधान सेल्फीच्या रूपाने सोशल मीडियावर प्रेरणादायी संदेश बनून पसरला. हा सेल्फी पॉईंट फक्त फोटो झोन नव्हता, तो रक्तदानाची संस्कृती अभिमानाने जगासमोर मांडणारा प्रेरणादायी मंच ठरला. प्रत्येक सेल्फी म्हणजे एक सांगितलेली प्रेरणा एक पेरलेली मानवतेची बीज आणि एक नवीन रक्तदाता तयार होण्याची शक्यता या वर्षातील ४था शिबिर — एक मजबूत पाऊल!युवा रक्तदाता ग्रुप आणि कुलसुम ॲग्रो टेक यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षात एकूण ४ शिबिरे आयोजित केली आहेत आणि आजपर्यंत एकूण १५९ रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात यश प्राप्त झाल आहे. डिसेंबर महिन्यात आणखी एक शिबिर आयोजित करण्याचा संकल्प आहे!विशेष – सिंधू रक्तक्रांती ॲपचे लोकार्पण या शिबिरात “सिंधू रक्तक्रांती ॲप” चे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. यामुळे आतारक्तदात्यांची माहिती व्यवस्थित आणि सुरक्षित नोंदवली जाईलकोणता रक्तगट कुठे उपलब्ध आहे  एका क्लिकमध्ये कळेलगरजेच्या वेळी संबंधित दात्यांशी त्वरित संपर्क साधणे शक्य होईल विविध संस्थांचे योगदान एकाच ठिकाणी दिसेल.