
देवगड : देवगड तालुका गुजराती नवरात्र मंडळ आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जामसंडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जामसंडे हायस्कूल येथे १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिर व जागतिक रक्तदाता दिन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी व रक्तदान शिबिरा मध्ये महिला व पुरुष युवक रक्तदात्यांनी रक्तदान करून जास्तीत जास्त सहभाग घेऊन जागतिक व्यक्तिदाचा दिन साजरा करण्यासाठी आपला हातभार लावावा. सध्या जिल्हा ब्लड बँकेत ओरोस येथे ए बी प्लस व बी प्लस चा रक्त दात्याची गरज भासत असून या शिबिरामध्ये या गटाच्या रक्तदात्यांनी आवर्जून रक्तदान करावे असे आवाहन कांतीलाल पटेल हिराचंद तानवडे यांनी केले आहे.