सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर

CM देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचंनिमित्त
Edited by: विनायक गांवस
Published on: July 22, 2025 15:41 PM
views 59  views

सावंतवाडी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात शहर भाजपच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते‌. युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस सामाजिक जाणीवांचा आहे. पवित्र असं दान यानिमित्ताने केलं जातं आहे असं मत युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केले. तर आमच्या रक्तात राष्ट्रभक्ती आहे. त्यामुळे रक्तदान शिबीराच आयोजन राज्यभरात केलं आहे‌. सिंधुदुर्गात देखील मोठ्या संख्येने दात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे महिला जिल्हाध्यक्षा सौ. कोरगावकर म्हणाल्या. वैद्यकीय अधिक्षक डॉ. ऐवळे यांनी या सामाजिक उपक्रमासाठी दात्यांचे आयोजकांना धन्यवाद दिले. उपस्थितांनी रक्तदान करत या शिबिरात सहभाग घेतला.‌

यावेळी युवराज लखमराजे भोंसले, भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मंडळ अध्यक्ष स्वागत नाटेकर, संतोष राऊळ, पंकज पेडणेकर,रविंद्र मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, माजी सभापती मानसी धुरी, शर्वाणी गांवकर, उन्नती धुरी, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, मेघना साळगावकर, ॲड. संजू शिरोडकर, प्रविण देसाई, मधूकर देसाई, दिलिप भालेकर, संजय शिरसाट, नागेश जगताप, बंटी जामदार, अमित गौंडळकर, जितेंद्र गावकर, हितेन नाईक आदी उपस्थित होते.