सावंतवाडी : सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ३० एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सातुळी मधलीवाडी येथे सातुळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे. दाणोली आणि ओटवणे पंचक्रोशीतील इच्छुक रक्तदात्यांनी बाळू कानसे ९४२३५८६१७४ आणि श्रीराम कानसे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ओमकार परब आणि गिरीश गावडे यांनी केले आहे.