
सावंतवाडी : ओटवणे रणझुंझार ३८+ ग्रुपच्यावतीने रविवारी ओटवणे शाळा नं १ येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ. योगेश किरवले यांच्याहस्ते करण्यात आले..
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ओटवणे रणझुंझार ३८+ ग्रुपने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे कौतुक केले. रक्त संकलनासाठी सावंतवाडी रक्तपेढीच्या लॅब टेक्निशियन प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अनिल खाडे यांचे सहकार्य लाभले. तसेच या शिबिराच्या नियोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य समीक्षा गावकर, मनाली गावकर, सुभाष गावकर यांच्यासह ओटवणे रणझुंझार ३८+ ग्रुपच्या सर्व सभासदांचे सहकार्य लाभले.
या रक्तदान शिबिरात विजय गवंडे, प्रशांत बुराण, रामचंद्र भालेकर, आनंद भैरवकर, जयगणेश गावकर, विजय म्हापसेकर, दिनेश गवंडे, विश्वनाथ बोर्ये, मधुकर गावकर, किरण गावकर, संकेत मयेकर, स्वप्निल म्हापसेकर, आर्यन मयेकर, अक्षय तळवडेकर, महादेव केळुसकर, वासुदेव गांवकर, पंकज गावकर, अजित आंगचेकर, आकाश मेस्त्री, सत्यवान गावकर, प्रवीण शिंदे, संदेश राऊळ आदींनी रक्तदान केले.यावेळी सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मंगेश गावकर, प्रभाकर गावकर, पोलीस पाटील शेखर गावकर, संतोष तावडे, सगुण गावकर, बाळा गावकर, ज्ञानेश्वर गावकर, जयसिंग गावकर, अमेय गावडे, अनंत तावडे, आनंद गावकर, रामा म्हैसकर, लवू तावडे, सुधाकर बुराण, सुनील मयेकर, स्वप्निल उपरकर, लूमा जाधव, संदीप सोनार, रोहिदास कासकर आदी उपस्थित होते.