फार्मसी अभ्यासक्रमावर 3 जूनला मार्गदर्शन शिबिर

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: June 01, 2023 21:19 PM
views 200  views

सावंतवाडी : औषध निर्माण क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रवेश प्रक्रिया यासंबंधीचे मार्गदर्शन शिबीर शनिवार, 3 जून रोजी सकाळी 10.30 वा.यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्राचार्य डॉ.विजय जगताप हे उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

     समाजामध्ये फार्मसी म्हणजे फक्त औषधाचे दुकान काढण्यासाठी परवाना मिळतो अशी धारणा आहे.  परंतु त्यापेक्षाही अनेक संधी या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यासंबंधीची नेमकी माहिती यावेळी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. फार्मसी प्रवेश प्रक्रिया ही महाराष्ट्र शासन ऑनलाईन पद्धतीने राबवते. या प्रक्रियेचे विविध टप्पे व प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे  याविषयी देखील मार्गदर्शन केले जाणार आहे.

     शिबिराला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजने सावंतवाडी बस स्थानकाजवळून स्कूलबसची सोय देखील उपलब्ध केलेली आहे. तरी फार्मसी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या  विद्यार्थ्यांनी  या शिबिराला  जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कॉलेज तर्फे करण्यात आले आहे.