
सावंतवाडी : भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. भोसले नॉलेज सिटीत ते १ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी BKC आणि भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांचं कौतुक केलं. त्यानंतर अच्युत सावंत भोसले यांनीही पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतलेत.
शिक्षण हे भविष्य आपण जाणलात. शिक्षण संस्था बनवून मोठं काम केलं. अनेक युनिव्हर्सिटी मी फिरलो. पण आज जे पाहिलं ते वर्ल्ड क्लास आहे. BKC त नॉलेजला महत्व आहे. BKC विकासाचा केंद्रबिंदू ठरावा यासाठी आशीर्वाद देतो. मोठे व्हा. असं म्हणत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी कौतुक केलं.
यावेळी माध्यम सल्लागार जयु भाटकर, ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले आदी उपस्थित आहेत.