
कुडाळ : माणगाव ग्रामपंचायत निवडणूकीत हमरा तुमरी नंतर प्रकरण मिटल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे उमेदवार बापू बागवे आणि भाजपचे उमेदवार दत्ता कोरगावकर यांचे दोन गट समोरासमोर भिडल्याची चर्चा आहे. अखेर माणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला हिंसक वळण लागलेच आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपचे उमेदवार दत्ता कोरगावकर यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि शिवसेनेचे प्रभाग चार चे उमेदवार बापू बागवे यांचे समर्थक यांच्यात प्रभाग क्रमांक चार च्या कुंभारवाडी येथील बुथवर जोरदार हमरीतुमरी झाली. यावेळी हे दोन्ही समर्थक एकमेकास भिडले. पण काही नागरिकांनी मध्यस्थी केल्याने होणारा मोठा राडा टळला. दरम्यान, या घटनेने एकच तणाव निर्माण झाला होता. शिवसेना-भाजप मधली ही दरी आता नेत्यांनंतर कार्यकर्त्यांमध्ये दिसू लागली आहे. यामुळे पुन्हा एकदा माणगावात निवडणुकीत तणाव निर्माण झाला आहे.