
सावंतवाडी : सिंधुदुर्ग भाजपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली तिरंगा दौड उद्या सकाळी सहा वाजता सावंतवाडीत रंगणार आहे. यासाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोणतेही प्रवेश शुल्क आकारलेले नाही
भाजपचे युवा नेते तथा घर घर तिरंगा अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून आणी महेंद्रा अकॅडमी यांच्या सहकार्यातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सकाळी सव्वा सहा वाजता येथील सावंतवाडी उद्यानाकडून सुरू होणार आहे आणि सावंतवाडी उद्यानाकडे ती समाप्त होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र आणि खास टी-शर्ट देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. यात पुरूषांसाठी १०,०००,७,००० आणि ५,००० अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर १४ वर्षांखालील मुलांसाठी ३,०००,२००० आणी १००० अशी बक्षिसे असणार आहेत. महिला गटासाठी ५,०००,३,००० आणि २,००० तर लहान मुलींसाठी: ३,०००, २,००० आणि १,००० अशी बक्षिसे आहेत. स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तिरंगा दौड'च्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा करणे आणि नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम वाढवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असून जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.