म्हापण उपसरपंचपदी भाजपचे श्रीकृष्ण उर्फ सुरेश ठाकूर बिनविरोध

अविनाश खोत यांनी अर्ज मागे घेत ठाकूर यांना दिला पाठिंबा
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 27, 2022 17:15 PM
views 168  views

म्हापण : म्हापण ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यभार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आकांक्षा विश्वनाथ चव्हाण यांनी स्वीकारला. उपसरपंचपदी भाजपचे श्रीकृष्ण उर्फ सुरेश ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदासाठी अविनाश खोत यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु अविनाश खोत यांनी आपला अर्ज मागे घेत श्रीकृष्ण ठाकूर यांची बिनविरोध उपसरपंच पदाची वाट मोकळी केली. त्यामुळे गावच्या विकासासाठी सर्व पक्षीय पदाधिकारी  एकत्रित येत खेळीमेळीच्या वातावरणात म्हापण गावच्या नवनिर्वाचित सरपंच व  उपसरपंच यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावच्या विकासासाठी कोणताही राजकारण करु नये, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांना वेंगुर्ले पंचायत समिती माजी सभापती, यशवंत परब, शिवसेना युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट,केळूस माजी सरपंच किशोर केळूसकर, वसंत साटम,माजी सभापती विकास गवंडे, विजय ठाकूर, प्रशांत तळावडेकर, माजी सरपंच आनंद गावडे, दशरथ चव्हाण, नामदेव चव्हाण,माजी उपसरपंच अशोक पाटकर, बाळकृष्ण दाभोलकर, गावातील आदी मान्यवर उपस्थित होते.