
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या समीक्षा सत्यवान तांडेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज बुधवारी १२ मार्च रोजी सरपंच संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात ही निवड संपन्न झाली. ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ यांनी या सभेचे कामकाज पाहिले. उपसरपंच महादेव विजय नाईक यांनी 11 फेब्रुवारी रोजी राजीनामा दिल्यानंतर आज रिक्त झालेल्या जागेसाठी उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद गावडे, प्रणिता सावंत, सुलोचना परब, दीपक कवठणकर, महादेव नाईक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष उमेश सावंत, ग्रामस्थ सत्यवान तांडेल, विठ्ठल तांडेल, शंकर तांडेल, उत्तम सावंत ,दादा तांडेल, निलेश गावडे, कृष्णा तांडेल, महेश गावडे, नंदकिशोर चव्हाण, ग्रा. प.कर्मचारी वैशाली नाईक, घन:श्याम नाईक आदी उपस्थित होते. ही निवड जाहीर होताच भाजपा महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ यांनी नवनिर्वाचित उपसरपंच समीक्षा तांडेल यांचे अभिनंदन केले.