सावंतवाडीत भाजपकडून शहर विकासाचा 'महासंकल्प'

Edited by: विनायक गांवस
Published on: November 25, 2025 15:54 PM
views 21  views

सावंतवाडी : शुभकार्याला श्री देव पाटेकराची आठवण आम्ही करतो. देव पाटेकर सावंत-भोसलेंसह आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रात देखील राजघराण्याच योगदान मोठं. माणसाला मागे कुणी काय केलं ? हे विसरायची सवय असते असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. तर सावंतवाडी नगरपरिषदेची ही निवडणूक  सावंतवाडीच्या अस्मितेची, प्रतिष्ठेची व स्वाभिमानाची निवडणूक आहे‌‌. सावंतवाडी शहराशी राजघराण्याचं अतुट नातं आहे. शहराला खरी ओळख राजघराण्यान दिली आहे. संस्थान काळात येथील नागरीकांची गरज ओळखून रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्याचा विचार राजघराण्यानं केला. दुरदृष्टी ठेवून चांगल शहर निर्माण करण्यासाठी नियोजन केलं आहे‌. त्यामुळे आज राजघराण्याच्या त्या योगदानाची परतफेड करण्याची वेळ आहे. त्यामुळे श्रद्धाराजे भोसलेंसह भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना आशीर्वाद द्या, विकास करण्याची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.     

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ येथील गांधी चौक येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेतून त्यांनी जनतेला आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, युवा नेते विशाल परब, सौ. वेदीका परब, शहराध्यक्ष तथा उमेदवार सुधीर आडीवरेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, राजू बेग, ॲड. अनिल निरवडेकर, 

ॲड. ऋजूल पाटणकर, गोपाळ नाईक, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगांवकर, अमित गवंडळकर, दीपाली भालेकर, मेघा डुबळे, समृद्धी विर्नोडकर, ॲड. संजू शिरोडकर, दादू कविटकर, संध्या तेरसे, निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, महेशर शेख, वीणा जाधव यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे राहण्याची इच्छा जेव्हा राजघराण्याने आमच्याकडे व्यक्त केली तेव्हा कोणताही विचार न करता आम्ही त्यांना नगराध्यक्षपदासाठी संधी दिली. खरतरं राजघराण्याचे या शहरा प्रति असलेले योगदान पाहता सगळ्याच राजकीय पक्षांकडून सावंतवाडीकर म्हणून विचार होईल अशी अपेक्षा होती. समोरून कोणी अर्ज दाखल करता नये होता त्यांनी श्रद्धा राजेंना बिनशर्त पाठिंबा देणे अपेक्षित होते मात्र असे झाले नसले तरीही सावंतवाडीकर जनता मात्र राजघराण्याच्या स्नुषा असलेल्या श्रद्धाराजे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. आज प्रतिस्पर्ध्यांची वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटत आहे. राजघराण संपलं हा शब्द वापरला जातोय. मात्र या पूर्वी स्वतः च्या निवडणुकांमध्ये मदत व आशीर्वाद मागताना हा शब्द आठवला नाही का तेव्हा का ताठ भुमिका घेतली असा सवाल मंत्री राणेंनी केला. ते म्हणाले, राजकारण २ डिसेंबर पर्यंत आहे. मात्र, हेच घराणं इथे पिढ्यान पिढ्या असणार आहे. राजघराणं आपला स्वाभिमान, अस्मिता आहे. आपल्या घरात माता-भगिनी आहेत याचाही विचार केला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

 ते म्हणाले, खरं तरं आपल्याला आ. दीपक केसरकर यांचं आश्चर्य वाटलं. ते राजघराणं म्हणून श्रद्धाराजेंना पाठींबा देतील अस वाटल होतं. मात्र, राजघराण्याच्या आशीर्वादाशिवाय न बोलणारे केसरकर आता का बोलले नाहीत ? पाठिंबा का दिला नाही असा सवाल त्यांनी केला. मात्र असं असलं तरीही व राजकारण म्हणून जरी त्यांनी  उमेदवार उभा केला असला तरीही आ. केसरकर यांचा पाठिंबा श्रद्धाराजेंनाच आहे, असा दावा त्यांनी केला. श्रद्धाराजेंना मत म्हणजे दीपक केसरकरांना मत आहे. ये अंदर की बात है, दीपक केसरकर हमारे साथ आहे. रविंद्र चव्हाणं यांनी बोलावलं असतं तर कदाचित आज व्यासपीठावर देखील दिसले असते. त्यामुळे ही निवडणूक राजकारणाची नाही, परतफेड करण्याची आहे. पुढच्या पिढीला माणूसकी शिकवण्याची ही निवडणूक आहे. राजघराण्यासह उभं राहण्याची ही निवडणूक आहे, असेही ते म्हणाले. युवराज्ञींचं व्हिजन शहर विकासाच आहे. भाजपच्या माध्यमातून त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तुम्ही फक्त भाजपला आशीर्वाद द्या. पालकमंत्री मी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. भरघोस निधी सावंतवाडी शहराला देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  काल कणकवलीच्या निवडणूकीच्या सभेत मंत्री उदय सामंत म्हणाले आम्हाला निवडून द्या आम्ही निधीसाठी पालकमंत्र्यांकडे जाऊ. मात्र जर पालकमंत्र्यांकडेच यायचे असेल तर  बायपास पेक्षा थेट पालकमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनाच मतदान करा. थेट निधी मिळेल कारण निधीच्या चाव्या माझ्या खिशात आहेत. आचारसंहिता असल्याने काढू शकत नाही. पण, पुढे माझ्याकडे त्या माझ्याकडेच असणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडीतील आरोग्याची समस्या मोठी आहे. मल्टीस्पेशालिटीबाबत नंतर निर्णय होईल मात्र तोपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात स्पेशालिस्ट असे पर्मंनंट डॉक्टर व आवश्यक असलेली सर्व अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करून देतो. जेणेकरून येथील रुग्णांना गोवा बांबोळीला जायची गरज भासणार नाही असा शब्द त्यांनी दिला. मल्टीस्पेशालिटीवर चर्चेतून मार्ग काढला जाईल कारण स्थानिक डॉक्टरांचीही चिंता आहे. त्यामुळे योग्य विचार करून त्यातून मार्ग काढला जाईल आता राजघराणे आमच्या सोबतच असल्याने जमिनीचा प्रश्न निर्माण होणार नाही असेही ते म्हणाले. ज्यांना सावंतवाडीची अस्मिता आहे तसेच आय लव्ह सावंतवाडी म्हणणाऱ्यांनी राजघराण्याच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना जनता पेटून उठल्यावर काय होत ते दाखवून द्या. केवळ श्रद्धाराजे यांनाच नाही तर तिनदा कमळ बटन दाबून त्यांच्यासह भारतीय जनता पार्टीचं सगळं पॅनेल निवडून द्या, तुमच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेतो,अशी ग्वाही त्यांनी सरते शेवटी दिली.

श्री. चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनातून विकास व्हावा व येथील दरडोई उत्पन्न वाढावे हा विचार तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांचा नेहमीच राहिला आहे. आज हा विचार पुढे नेण्याचं काम आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले करीत आहेत. आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून माध्यमातून येथील महिलांना व बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे त्यांचे व्हिजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून त्यांचं हे व्हिजन पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निश्चितच करू असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, धुळ्यात राजघराण्याच्या राजमाता निवडणूक लढवीत असल्याने तेथील लोकांनी व सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्यांना व सर्व पॅनलला बिनविरोध निवडून दिलं. त्यामुळे सावंतवाडीतील शहरवासियांनीही याचा विचार करावा. सिंधुदुर्गातील प्रत्येक नगरपरिषद भाजपच्या ताब्यात द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याला दत्तक घेतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लहानपणापासून सावंतवाडी शहर बघत आलोय. मोती तलावाच आकर्षण आजही आहे. शहराला सौंदर्य आहे. शुभकार्याला श्री देव पाटेकराची आठवण आम्ही करतो. देव पाटेकर सावंत-भोसलेंसोबत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रात देखील राजघराण्याच योगदान आहे. 

दाणोलीचे समर्थ साटम महाराजांच्या सेवेचा व्रत हे राजघराण्याने घेतलं. ऐतिहासिक राजघराण्याला आध्यात्मिक जोड त्यांनी दिली. त्यामुळे अशा ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा असलेल्या राजघराण्याच्या लेकीसोबत येतील जनता निश्चितच पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सावंतवाडीच्या संस्थानकालीन राजघराण्याने विजेची गरज न लागता केवळ गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून  पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती. आज शहरात येणार पाणी राजघराण्याच्या पुण्याईने येत याची जाण ठेवावी. दुरदृष्टीन केलेला विचार यातून दिसतो. लोकसंख्या वाढली असल्याने ड्रेनेज सिस्टीममध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. या व अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी व नवे प्रकल्प राबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. त्यासाठी पार्लमेंट तू पंचायत एक विचारांच सरकार असणं आवश्यक आहे. त्यामुळे विकासाची गंगा शहरात आणण सोपं होईल, असं मत व्यक्त केले.ते म्हणाले, सावंतवाडीत आरोग्य सेवा तसेच इतर प्रशासकीय व खाजगी कामांसाठी ग्रामीण भागातील लोक नेहमी शहरात येतात. यावेळी नागरी सुविधांचा बोजा शहरावर पडतो. त्यामुळे नागरी सुविधांसोबतच येथे कायमस्वरूपी अशा आरोग्य सुविधा तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. वेंगुर्ला नगरपरिषद भाजपच्या हाती होती. तिथे झालेला कायापालट आज दिसत आहे. २३ प्रकल्प तिथे उभे राहिले आहेत. एक विचारांच सरकार असल्याने मोठ्या प्रमाणात निधी तिथे देण्यात आला. गतिमान विकास करता आल, पारितोषिक मिळवता आली. त्यामुळे सावंतवाडी करांनी देखील भवितव्याचा विचार करावा. शाश्वत विकासासाठी निधी अभावी राहिलेली भुमिगत विद्युत वाहिनी, ड्रेनेज सिस्टीम पुर्णत्वास आणण्यासाठी भाजपचा उमेदवार निवडून देण आवश्यक आहे. त्यासाठी तिनंही मतं कमळा समोरील बटन दाबून भाजपला मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलं. सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ येथील गांधी चौक येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.  

दरम्यान, भारतीय जनता पार्टीने सावंतवाडीतून निवडणूक लढण्याची संधी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, युवराज लखमराजे भोंसले यांचे आशीर्वाद मला आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सावंतवाडीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून त्यांनी केवळ सून म्हणूनच नाही तर बहीण व मुलगी म्हणून मला स्वीकारले आहे त्यामुळे माझ्यासह माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास भाजपच्या  नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केले.  त्या म्हणाल्या, येथील जनता मला आशीर्वाद देत आहे. तीच माझी ताकद आहे‌. सावंतवाडीच्या विकासाचं व्हिजन आम्ही घेऊन जात आहोत. राजेसाहेब रघुनाथ महाराज यांनी शहराच्या ड्रेनेज सिस्टीमच नियोजन केलं होतं. आता पुढील काळात हा वारसा पुढे नेताना नगराध्यक्ष म्हणून टाऊन प्लॅनिंग, रोजगार, आरोग्य, पर्यटन, मनोरंजन सुविधा वाढवण्यासाठी माझा भर राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट मध्ये झालय. त्यामुळे येथील रोजगार वाढवण्यासाठी माझा भर राहणार आहे. महिला, युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. येथील लाकडी खेळण्यांच्या उत्पादनांसह इतर उत्पादनांनाही  जागतिक बाजारपेठेत स्थान देण्यासाठी माझा भर असेल‌, असं मत त्यांनी व्यक्त केले.  मी सावंतवाडीची सुन असल्याचा अभिमान आहे‌. राजघराण्याचा वारसा मी पुढे घेऊन जात आहे‌. सावंतवाडीची मुलगी, सुन म्हणून मला लोकांनी स्वीकारलं आहे‌‌. राजकारणात मी नवीन आहे. पण, विकसीत सावंतवाडी माझी जिद्द आहे‌. भाजपच्या आशीर्वादाने पाच वर्षांत सावंतवाडीचा कायापालट करून दाखवणार तुम्ही माझ्यासह आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन युवराज्ञींनी यावेळी केलं. तसेच लोकसेवेसाठी आम्ही राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. ही सुंदरवाडी खेमसावंत यांनी वसवली‌. ३५० वर्षांचा इतिहास या शहराला आहे. मोती तलाव, राजवाडा लोकांचा आहे या सर्व ऐतिहासिक वास्तू व शहर हे सावंतवाडीकरांचेच राहील. आम्हाला फक्त सावंतवाडीकरांची सेवा करायची आहे, असं मत युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केले. आरोग्य, ड्रेनेज सिस्टीमसह इतर सुविधा राजघराण्याच्या काळात झाल्या. मात्र, नंतर त्यावर तेवढं लक्ष दिलं गेलं नाही आज आमच्या माध्यमातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून ती संधी आम्हाला मिळत आहे‌. आरोग्य सेवा व ड्रेनेजची समस्या आम्ही १०० टक्के सोडवणार आहोत. त्या काळात राजघराण्यान हे काम केले.‌ युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले या सामान्य घराण्यातील आहेत. मात्र, त्यांचा विवाह राजघराण्याशी झाला. त्यांनाही सामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. राजमाता, राणी हा मान जनतेनं आम्हाला दिला. जमीन, पैसा येतील जातील पण लोक कायम सोबत राहतात यासारख भाग्य आहे. शिवरामराजे भोसले यांचा वारसा आम्ही चालवत आहोत. मधल्या पिढीने सामाजिक, शैक्षणिक कार्य केलं. अनेक जमीनी दिल्या आहेत. आजही जमीनी द्यायला तयार आहोत. लोकांसाठी काम करण्याचा आमचा हेतू आहे. राजघराण सदैव लोकांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही सामान्य घराण्यासारखेच आहोत. तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध असणार असून तुमच्या दारात देखील सेवेसाठी थांबणार आहोत. तुमच्या अडचणी आमच्या अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी आम्ही तत्पर राहणार आहोत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन लखमराजे भोंसले यांनी केलं.  स्व. बापूसाहेब महाराजांनी संस्थानाची ही सुंदरवाडी नगरपरिषदेच्या रुपाने शासनाकडे दिली. आजही या शहरातील ऐतिहासिक मोती तलाव असो वा अन्य ऐतिहासिक वास्तू यांचं जतन व संरक्षण करण्याचं काम आम्ही राजघराणं म्हणून करत आहोत. मात्र, असं असलं तरीही मोती तलाव असो वा इतर ऐतिहासिक वास्तू या सावंतवाडीकरांच्याच आहेत व त्यांच्याच आहेत व राहतील. हे राजघराणं व ही पदं ही जनतेने दिलेली आहेत. आम्ही राजघराण्याने दिलेले योगदान व सेवा पाहूनच जनतेने आम्हाला हे राजपद बहाल केलेलं आहे. याच संस्थानकालीन राज घराण्याने या शहराची ड्रेनेज सिस्टीम असो वा पाणी पुरवठा योजना त्या काळात सुरू केल्यात आम्हाला आता या सत्तेच्या माध्यमातून त्याचं संवर्धन करायचं आहे. 

शहरातील शैक्षणिक संस्था असोत वा येथील अनेक प्रकल्प या सर्वांसाठी राजघराण्याने विनामूल्य जमीन दिली आहे. यापुढेही देणार आहोत. आम्ही राजघराण्यातील असलो तरीही सर्वसामान्यांसारखेच राहत आहोत. आम्ही तुमच्यासाठी २४ तास काम करणार तसेच नगरपरिषदेत बसणार पण जनतेच्या घरापर्यंत पोहोचणार आहोत. पुढील ५ वर्षात सावंतवाडीचे चित्र बदलू व विकसीत सावंतवाडी घडवू, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

 सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ येथील गांधी चौक येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

तसेच भाजप युवा नेते विशाल परब म्हणाले,  तीन डिसेंबरचा गुलाल हा भाजपचाच असणार आहे‌. सावंतवाडीची सभा ही शहरं विकासाच्या महासंकल्पाची आहे‌.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले निवडणूक रिंगणात आहेत. आमच्या भाजपच्या सैनिकांनी त्यांच्या प्रचारासाठी शहर पिंजून काढलं आहे. शहराचा कायापालट फक्त भाजप करू शकते. देशात मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस व जिल्ह्यात रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आहेत. त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.