पहिल्या फेरीत आचरेत भाजपचे जेरॉन फर्नांडीस आघाडीवर..!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 06, 2023 10:51 AM
views 207  views

मालवण : ग्रामपंचायत निवडणूक निकाल काही क्षणातच सुरु होणार आहे. तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आचरा ग्रामपंचायत कोणाची ? हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. मालवण तहसील कार्यालयात ही मतमोजणी होत असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. पहिल्या फेरीत आचरेत भाजपचे जेरॉन फर्नांडीस आघाडीवर असलेले पहायला मिळतात.