घर कोसळलेल्या वेंगुर्लेमधील गरीब मच्छिमार महिलेला भाजपाचा मदतीचा हात

युवमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आर्थिक योगदान देत उचलला वाटा
Edited by: दिपेश परब
Published on: July 18, 2024 13:08 PM
views 186  views

वेंगुर्ला : संततधार कोसळणाऱ्या पावसाने वेंगुर्ले नवाबाग भागातील विद्या दत्ताराम आरोंदेकर या गरीब मच्छिमार महिलेचे घर कोसळल्याने कुटुंबासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. शासकीय प्रक्रियेतून मदत मिळेपर्यंत तातडीने तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्यासाठी डागडुजी करणे गरजेचे होते. भाजपाचे वेंगुर्ले तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा पदाधिकारी प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मदतीसाठी आपल्या पद्धतीने प्रयत्न सुरू केले. यावेळी नेहमीच लोकांना अडीअडचणीत मदतीला धावणारे संवेदनशील नेतृत्व असलेले भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या कानावर हा वृत्तांत गेल्यावर त्यांनी तातडीने आपल्याकडून आर्थिक स्वरूपात काही मदत दिली. यावेळी भाजप पदाधिकारी यांच्यावतीने ती आर्थिक मदत तातडीने त्या मच्छिमार महिलेकडे सुपूर्द करण्यात आली आहे.  सदर मच्छिमार महिलेने याप्रसंगी विशाल परब यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनवेल फर्नांडिस,तालुका सरचिटणीस  बाबली वांयगणकर, मच्छीमार नेते दादा केळुसकर, सरपंच संघटना अध्यक्ष पपू परब,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रणव वायगणकर,सायमन आल्मेडा,पुंडलिक हळदणकर,मनोहर तांडेल,गौरेश खानोलकर व कार्यकर्ते उपस्थित आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.