
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गांधी चौक येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेत नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील शिवसेनेतील महिलांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
प्रवेशकर्त्या महिलांना त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. प्रवेशकर्त्यांमध्ये साक्षी गवस, नीलिमा टिळवे, साक्षी टिळवे, अश्विनी सावंत, आरती कुमार, सुचिता खानोलकर, अनिका हवालदार, कादंबरी राणे, भाग्यश्री भराडी, सुष्मिता पेडणेकर, जान्हवी सावंत, प्रिया पालेकर, सविता सहानी तसेच प्रकाशनी ठाकूर त्यांच्यासह महिलांचा सहभाग होता.










