कोळपेत भाजपचा जलवा | हुसेन लांजेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्तीप्रदर्शन

रॅलीसह घरोघरी प्रचार आणि बैठकांवरही भर
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 15, 2022 12:31 PM
views 628  views

वैभववाडी : कोळपे ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारात भाजपने आघाडी घेतली आहे. आज गावात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावात प्रचारफेरी काढली. भाजपचे तालुका अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे हेही प्रचारात उतरले होते.

कोळपे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह नऊ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपाकडून जोरदार ताकद लावली आहे. युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच पँनेल निवडणूक लढवत आहे. भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. घरोघरी प्रचारासह बैठकांवरही भर दिला आहे. आज भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत गावात प्रचारफेरी काढली. यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.