मंत्री दीपक केसरकर यांच्या होमपीचवर भाजपचा 'समारोप मेळावा' !

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, निलेश राणे, राजन तेली काय बोलणार ?
Edited by:
Published on: April 19, 2023 16:44 PM
views 700  views

सावंतवाडी : विधानसभा मतदारसंघातील भाजपचा महाविजय अभियान २०२४ चा 'समारोप मेळावा' शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री दीपक केसरकर यांच्या होमपीचवर होणार आहे. सावंतवाडीच्या गांधी चौकात या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या मेळाव्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बुधवारी सायंकाळी ठीक ६ वा. हा मेळावा होणार असून यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह स्थानिक नेतेमंडळी विशेष परिश्रम घेत आहेत.

युतीत एकत्र असणाऱ्या दीपक केसरकर यांच्यावर स्थानिक भाजप नेत्यांकडून होणारी जहरी टिका त्यातच होमग्राउंडवर होणारा महाविजय अभियान  'समारोप मेळावा' या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण व निलेश राणे काय बोलणार ? याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहिले आहे. तर महाविजय अभियान 'समारोप' हा भाजपचा २०२४ चा प्रारंभ असल्याची जोरदार चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.