
सावंतवाडी : जिल्ह्यात जवळपास ४४ बिनविरोध ग्रामपंचायत पैकी ३० ग्रामपंचायतीवर भाजपची पॅंनल, ३० पेक्षा अधिक भाजपचे सरपंच बिनविरोध निवडून आल्याचा दावा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेशी अंतिम टप्प्यात युती झाल्यान जिथं शक्य होत तिथे आम्ही सहकार्य केलेले आहे. विकासाच्या मुद्यावर भाजपला ग्रामपंचायतीत भरभरून असं यश मिळत आहे. तर ३२५ पैकी किमान २२५ पेक्षा जास्त ग्रामपंचायत भाजप जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, मनोज नाईक, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगांवकर आदी उपस्थित होते.