
सावंतवाडी : तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपातच बंडखोरी वाढत आहे. माजी सरपंच प्रमोद गावडेंसह आता युवा नेते उद्योजक अमेय पै यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून स्थानिकांना डावलून संदीप गावडेंना उमेदवारी दिल्याने स्थानिकांत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून बंडखोरीच सत्र सुरूच असून भाजपचे युवा नेते, उद्योजक अमेय पै यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर घारे, सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपन इथून स्थानिकांना डावलल्याने प्रचंड रोष असून भाजपच्या प्रमोद गावडेंनंतर श्री. पैंनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी भुषण बांदिवडेकर उपस्थित होते.











