चाफेड सरपंचांचा सदस्यांसह नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 22, 2024 10:35 AM
views 309  views

देवगड : देवगड तालुक्यातील चाफेड गावचे सरपंच किरण लीलाधर मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य सौ. सान्वी मेस्त्री, सौ. प्रतिभा मेस्त्री, सौ. मानशी परब यांच्यासह साळकरवाडीतील ग्रामस्थांनी आम.नितेश राणे यांच्या उपस्थित भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळ आम. नितेश राणे यांनी त्यांचे भाजपची शाल घालून स्वागत केले. 

    यावेळी आम. नितेश राणे, भाजपा जिल्हा  सरचिटणीस संदीप साटम, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य मंगेश लोके, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, देवगड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, माजी प. स. सदस्य सुभाष नार्वेकर, चाफेड सरपंच किरण मेस्त्री, माजी सरपंच सत्यवान भोगले, शिरगांव विभाग प्रमुख राजेंद्र शेट्ये, साळशी माजी सरपंच वैभव साळसकर, सत्यवान सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप पाटील, भाजपा बूथ अध्यक्ष सिद्धेश भोगले,  माजी तंटामुक्त समिती  अध्यक्ष प्रवीण राणे, ग्रा. प. सदस्य सुनील कांडर, विजय परब, माजी सरपंच आकाश राणे, भरणी गावचे माजी प.स.सदस्य गणेश तांबे, कुवळे सरपंच सुभाष कदम, प्रकाश सावंत, पंकज दुखंडे, माजी सरपंच संतोष साळसकर, ग्रा. प. सदस्य सुदर्शन साळकर, पंढरीनाथ कांडर, सत्यवान कांडर, पोलीस पाटील संतोष सावंत, वसंत पवार, माजी उपसरपंच सुनील धुरी आदींसह सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

   यावेळी चाफेड भोगलेवाडी ते साळशी या प्रजिमा मार्ग १५ रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, चाफेड गावठण रस्त्याच्या उर्वरित रस्त्याचे डांबरीकरणाचे भूमिपूजन माजी सरपंच सत्यवान भोगले, साळकरवाडी  रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन ग्रा. प. सदस्य सुदर्शन उर्फ नागेश साळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. 

  यावेळी बोलताना आम. नितेश राणे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोकणचे भाग्यविधाते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या भाजप पक्षात तुम्ही आज प्रवेश करीत आहात. त्यामुळे यापुढील काळात चाफेड गावाचा सर्वांगीण विकासाचा निधी कधीच कमी पडणार नाही. तुमचा आमदार हा आता सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. माझ्या संपूर्ण मतदारसंघातील ३ तालुक्यात मी आजपर्यंत २ हजार २३८ कोटींपेक्षा जास्त  निधी आणून दिला. विरोधी पक्ष तुमची विकासकामे करूच शकणार नाही. त्यांचे काम  फक्त भाजपच्या वरिष्ठ नेत्यावर टीका करणे एव्हढेच आहे. येथील खासदार स्वतःच्या खासदार निधी पलीकडे काहीच करू शकणार नाही. असा टोला खासदार विनायक राऊत यांना लगावला. मी तुम्हाला केवळ शब्द देत नाही तर प्रत्यक्ष कृतीत उतरून चाफेड गावाची जी अपेक्षित  राहिलेली विकासकामे आहेत ती  करून दाखवणार. ८ वर्षे विरोधी पक्षाचा आमदार होतो तेव्हा मला तुम्ही सांभाळून घेतले. माझ्याबरोबर ठाम राहिलात. २ निवडणुका मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळी  तुम्ही माझी लीड वाढवून देणारे माझे मतदार आहात. माझ्यावर, पक्षावर विश्वास ठेवा. असाच पाठिंबा कायम ठेवा. भाजप पक्ष, संघटना मजबूत करा. पक्षाचे कार्यकर्ते वाढले पाहिजेत.  सरपंच किरण मेस्त्री यांनी आपल्या गावची विकासकामांची यादी करून  माझ्याकडे द्या. मी ती पूर्ण करून दाखवतो. चाफेड गावच्या विकासासाठी यापुढे कधीच निधी कमी पडू देणार नाही.असे ठाम आश्वासन यावेळी आम. नितेश राणे यांनी दिले. 

   यावेळी माजी सरपंच सत्यवान भोगले यांनी गावात अजून बरीच विकासकामे प्रलंबित राहिली आहेत. आरोग्य केंद्र, गावठण भागात मोबाईल टॉवर, स्ट्रीट लाईट, पशुवैद्यकीय दवाखाना, स्वतंत्र पोस्ट कार्यालय अशी अनेक विकासकामे पूर्ण होण्यासाठी आमदार यांच्याकडे मागणी केली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, सरपंच किरण मेस्त्री यांनी थोडक्यात मनोगते मांडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय परब व माजी सरपंच सत्यवान भोगले यांनी केले.