भाजप युवा मोर्चा दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी पराशर सावंत !

Edited by: संदीप देसाई
Published on: March 23, 2024 05:14 AM
views 145  views

दोडामार्ग : भारतीय जनता युवा मोर्चा दोडामार्ग तालुकाध्यक्ष पदी कोनाळ येथील पराशर जगन्नाथ सावंत यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटना वाढीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत पक्षाने त्यांना ही संधी दिली आहे.

त्यांनी कोनाळ गावचे सरपंच पद ही भूषविले आहे. तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. शिवाय तालुक्यातील जास्तीत जास्त युवक भाजप पक्षाशी जोडले जातील या दृष्टीने काम करणार असल्याचे यावेळी श्री. सावंत यांनी स्पष्ट केले.