
मालवण : भारतीय जनता पार्टी मालवण तालुक्यातील कार्यकर्ता मेळावा उद्या मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी जानकी मंगल कार्यालय मालवण कुंभारमाठ येथे दुपारी (3)तीन वाजता आयोजित केलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास भारतीय जनता पार्टी तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी ,जिल्हा परिषद /पंचायत समिती प्रभारी ,बुथ कार्यकारणी, महिला तालुका कार्यकारणी, बुथ वरील कार्यकर्ते, शहर मंडल कार्यकारणी, युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी सरपंच/ सदस्य ,सहकारी संस्था पदाधिकारी सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केलं आहे.