
कुडाळ : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये घामासन सुरू झाले आहे.उदय सामंत यांच्या ही जागा शिवसेना लढवणार या विधानानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही जागा भाजप लढवणार असा दावा करत धमाका उडवून दिला आहे.भारतीय जनता पार्टी ही जागा कोणत्याही परिस्थितीत लढणार आणी विजयी होणार असा दावा केला आहे.तसेच येणारा सर्व निवडणुकीसाठी भाजप सज्ज असल्याचा दावा प्रभाकर सावंत यांनी केला आहे.
प्रभाकर सावंत यांच्या या विधानाने शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये या जागेवरून कलगीतुरा रंगल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. उदय सामंत यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेना ही जागा भाजप सोबत लढवेल आणि शिवसेना जागा युतीतून विजयी होईल. असा दावा केला होता.तर किरण सामंत हे उमेदवार असू शकतात असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी उदय सामंत यांच्या विधानाची दुरुस्ती करत भाजप ही जागा कमळ चिन्हावर लढवेल असा दावा करत पुन्हा एकदा सणसणी माजून दिली आहे. त्यामुळे या जागेवरून युतीमध्ये दरी निर्माण होते की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
तसेच यावेळी बोलताना प्रभाकर सावंत बोलताना म्हणाले की रविंद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावराचे काम पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.त्यामुळे चाकरमान्यांनी रविंद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त केल्याचे पहायला मिळत आहे.
विनायक राऊत यांनी 2019 मध्ये युतीसोबत लढून विजयी होऊन सुद्धा युतीधर्म पाळला नाही.त्यामुळे विनायक राऊत यांनी युतीबाबत भाष्य करू नयेत.त्यामुळे "शिंक्याचे तुटेल आणी बोक्याचे फावेल" अस काही होणार नाही आणी त्या भ्रमात पण विनायक राऊत यांनी राहू नये. असा टोला राऊताना लगावला आहे.भाजप व शिवसेना जागावाटपाबाबत योग्य निर्णय घेतील.त्यामुळे विनायक राऊत आणि उगाचच आगीत तेल ओतण्याचे काम करू नये, असाही टोला लगावला आहे.