
वैभववाडी:गावातील अनेक विकासकामे ही भाजपा पक्ष व आम.नितेश राणे यांच्या माध्यमातून झाली आहेत. गावचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन गेली पाच वर्षे काम केले आहे. नागरिकांनी देखील या कामाच स्वागतच केले आहे. या विकासकामांच्या जोरावर आम्ही निवडणुकीत मतदारांकडे मते मागीतली आहेत. त्यामुळे याहीवेळी भाजपचीच सत्ता येणार असा विश्वास सरपंच शेरपुद्दीन बोबडे यांनी व्यक्त केला.
श्री. बोबडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,गावात गेली पाच वर्षे आम्ही पारदर्शक कारभार केला. अनेक विकासकामे गावात केली आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत जनतेने पुन्हा भाजपालाच आणण्याचा निर्धार केला आहे. सरपंच पदाच्या उमेदवार वैभवी दळवी व सर्व सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.विरोधकांकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. तसेच गावात भांडणे लावून घाणेरडे राजकारण केले जात आहे.याविरोधात गावकरीच पेटून उठले आहेत.त्यांनी भाजपच पँनेल निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
गावातील नागरिक हे सुज्ञ आहेत.ते विरोधकाच्या भुलथापांना बळी पडणार नाही. येथील जनता विकासाच्या बाजूनेच राहणार आहे.भाजपालाच पुन्हा साथ देणार आहेत.तसेच विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास श्री बोबडे यांनी व्यक्त केला.