
बांदा : नुकतच बांद्यामध्ये मतदान करून आलो आहे. संपूर्ण जिल्ह्यात भाजपा व युतीला मतदार भरभरून मतदान करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक मतदान करत आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व सत्ताकेंद्र भाजपकडे असून सव्वादोनशे पेक्षा जास्त ठिकाणी आमचे सरपंच निवडून येतील असा विश्वास जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी व्यक्त केला. तर बांदा ग्रामपंचायतच्या भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका नाईक यांनी आपल्यासह पॅंनलच्या १५ ही उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी सरपंच अक्रम खान, उमेदवार प्रियांका नाईक आदी उपस्थित होते.