
बांदा : बहुचर्चित बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभं केलं आहे ते बांदा शहर विकास पॅनेलनं. थेट सरपंच पदासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. अर्चना सुशांत पांगम मैदानात उतरल्या आहेत. पाचही प्रभागात त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला असून बांदावासिय यंदा परिवर्तन करणार, २५ वर्ष सत्तेत असलेल्या भाजपला धक्का देणार असा विश्वास अर्चना पांगम यांनी व्यक्त केलाय. तर माझासह बांदा शहर विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा सौ. पांगम यांनी केला.
यावेळी ठाकरे गट शिवसेना उपतालुकाप्रमुख सुशांत पांगम, उमेदवार राजेश विरनोडकर, साईप्रसाद काणेकर, रिया येडवे, निखिल मयेकर, अर्णव स्वार, ओंकारा नाडकर्णी, चित्रा भिसे, धीरज भिसे, अजय महाजन, ज्ञानेश्वर एडवे, प्रथमेश गोवेकर, अक्षय नाटेकर, संजू महाजन, गौरव महाजन, भाऊ वाळके, पांडूरंग नाटेकर, राकेश विरनोडकर, राजेश पावसकर, भैय्या गोवेकर, बिपीन येडवे, सुनील नाटेकर, अनुप महाजन आदि उपस्थित होते.