सावंतवाडीत शतप्रतिशत भाजपची भुमिका : राजन तेली

शिक्षणमंत्री केसरकरांना घरचा आहेर !
Edited by: विनायक गांवस
Published on: February 28, 2023 19:33 PM
views 291  views

सावंतवाडी : भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी रखडलेल्या मल्टिस्पेशालिटीच्या प्रश्नांवरून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना घरचा आहेर दिला आहे. सावंतवाडी सारख्या मोठ्या शहरात या गोष्टी होण आवश्यक होत्या. त्या झालेल्या नाहीत, त्याचा स्पीड तेवढा नाहीय. त्यामुळे सावंतवाडीसाठी वेगळ काहीतरी करावं हि भाजपची इच्छा आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. आगामी निवडणुकांत सावंतवाडीत शतप्रतिशत भाजपची भुमिका आहे असं मत तेलींनी व्यक्त केल.


यावेळी तेली म्हणाले, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन घरपट्टी, पाणीपट्टी वाढविण्या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित होत. परंतु, एकाधिकारशाहीनं घरपट्टी, पाणीपट्टी वाढविल्यानं लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मुख्याधिकारी यावर काय स्पष्टीकरण देतात हे लवकरच समजेल. तर हा विषय जिल्हाधिकारी यांच्या दरबारी नेऊन याला स्थगिती कशी मिळेल हा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. तर ३ वर्ष भुमिपूजन होऊन मल्टिस्पेशालिटीचा विषय प्रलंबित आहे. हे का प्रलंबित राहत याचा जनतेनं देखील विचार केला पाहिजे. ३५ कोटी रुपये देऊन देखील ते पैसे परत जातात, सांगितलेल्या गोष्टी होत नाहीत याचं आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करायची गरज आहे. त्यामुळे विविध संघटनांना सोबत घेऊन तालुक्यातील विकासाबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेतले जातील. तर मल्टिस्पेशालिटीच भुमिपूजन झाल्यानंतर तीन वर्षे लागतात याची कारणही शोधावी लागतील‌. सावंतवाडी सुद्धा इतर भागाप्रमाणे विकसित झाली पाहिजे. केसरकरांवर मी टिका टिपणी करणार नाही. शेवटी एका सरकारमध्ये ते आहेत. प्रश्न का रखडले याबाबत तेच अधिक बोलू शकतील. सावंतवाडी सारख्या मोठ्या शहरात या गोष्टी होण आवश्यक होत्या. त्या झालेल्या नाहीत, त्याचा स्पीड तेवढा नाहीय. त्यामुळे सावंतवाडी साठी वेगळ काहीतरी करावं हि भाजपची इच्छा आहे. हे शहर अधिक सुंदर दिसावे याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकचा निधी आणण्यासाठी भाजप म्हणून आमचा प्रयत्न आहे. मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या जागेचा विषय सर्वपक्षीय लोकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तर रोपवेसह, मोती तलावात नितीन गडकरी पॅटर्न प्रमणे फाउंटन प्रोजेक्टसाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.


दरम्यान, आगामी काळात शतप्रतिशत भाजप ही भुमिका आहे. पण, वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमचे प्रयत्न ग्रामपंचायत प्रमाणेच यश मिळवण्यासाठी असतील. जिल्ह्यातील तिन्ही नगरपरिषदांवर यश मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. पण, अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर देवेंद्र फडणवीस, नारायण राणे घेतील तो आम्हाला मान्य असेल असं मत राजन तेली यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजप नेते जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, आनंद नेवगी,विनोद सावंत, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.