
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 14 ऑगस्टला देशभरात फाळणी दिवस पाळला जाणार आहे. फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस म्हणून हा दिवस पाळण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस पाळला जाणार आहे. या निमित्तानं भाजपकडून राज्यभरात मूक मोर्चा काढला जाणार आहे. सावंतवाडी शहरात रविवारी सकाळी विभाजन विभीषिकाच्या निषेधार्थ मुकमोर्चा काढण्यात आला. भाजप कार्यालय ते गांधी चौक पर्यंत या मुक मोर्चाच आयोजन करण्यात आल होत. माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मुक मोर्चात सहभागी झाले होते.
देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या लाखो भारतीयांच्या संघर्ष व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस, १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ पाळण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने सोडला आहे. देशाचे विभाजन झाल्यामुळे झालेल्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी तसेच फाळणीच्या वेळी ज्यांनी प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे. तर अखंड भारताच्या झालेल्या फाळणीच्या निषेधार्थ हा मुकमोर्चा काढण्यात आला असल्याच माजी आमदार राजन तेली म्हणाले. तर दीडशे वर्षांच्या ब्रिटीश गुलामगिरीतून मुक्त होऊन प्राप्त झालेल्या स्वातंत्र्याचा यंदाचा अमृत महोत्सव हा प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अभिमानाचा सोहळा आहे. ब्रिटिशांनी फाळणी करुन भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण करून अखंड भारताच्या नकाशाला छेद दिला. ही कृती कधीच विसरता येणार नाही असं मत भाजप प्रवक्ते संजू परब यांनी व्यक्त केल.
याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महेश धुरी, रविंद्र मडगावकर, प्रमोद कामत, श्वेतल कोरगावकर, प्रियांका नाईक, शर्वरी धारगळकर, आरती माळकर, दिपाली भालेकर, मानसी धुरी, दिलीप भालेकर, जावेद खतीब, गुरुनाथ पेडणेकर, हनुमंत पेडणेकर, बंटी पुरोहित, केतन आजगावकर, गुरु मठकर, दादु कविटकर, पंकज पेडणेकर, संजय वरेरकर, सत्या बांदेकर, क्लेटस फर्नांडिस आदि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.