
सावंतवाडी : भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी प्रभाग क्रमांक १० मध्ये घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला. यावेळी उमेदवार ॲड. अनिल निरवडेकर यांनी प्रचार केला. भ्रष्टाचार मुक्त कामासाठी युवराज्ञीच हव्यात अस मत माजी नगरसेवक विलास जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी ॲड. अनिल निरवडेकर यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना युवराज्ञींचा विजय निश्चित होईल असा दावा केला. यावेळी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक विलास जाधव यांसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दीपेश शिंदे यांचा हटके प्रचार लक्षवेधी ठरला.











