कणकवली खरेदी विक्री संघ्याच्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता

शिवसेना ठाकरे गटाचा पराभवाचा धक्का ; कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 07, 2023 20:59 PM
views 199  views

कणकवली : कणकवली खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सिध्दीविनायक पॅनलने एकहाती  सत्ता मिळविली आहे.शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत पॅनेलचा दारुण पराभवाचा धक्का बसला आहे.आता भाजप व बाळासाहेब शिवसेनेला १४ जागांपैकी १४ दणदणीत विजय संपादन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष  केला .तर गणेश तांबे यांची १ जागा बिनविरोध झाली आहे. निकाल जाहीर होतात सर्व विजेत्या उमेदवारांनी ओम गणेश निवासस्थानी धाव घेतली. त्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे अभिनंदन करील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत पॅनल प्रमुख विठ्ठल देसाई संजना सावंत, बाळा जठार,संजय देसाई,महेश गुरव,रविंद्र शेट्ये,संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री,राजू पेडणेकर, प्रज्ञा ढवण,संदीप मेस्त्री,राजन परब,सुशील सावंत, बबलू सावंत,अनिल खोचरे,मंगेश तळगावकर,सुभाष मालंडकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचा निवडणूकीसाठी शनिवारी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात थेट लढत झाली आहे.

शेती सहकारी संस्था गटात ३७ ,संस्था मतदारसंघातून १९ असे १०० टक्के मतदान झाले आहे.तर अन्य गटातील ८२१ मतांपैकी ६३९ मतदान झाल्याने

७७.८३ टक्के मतदान झाले आहे.१५ पैकी एक जागा बिनविरोध झाल्याने १४ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात होते. कणकवली पंचायत समिती जुनी इमारत येथे मतदान व त्यानंतर मतमोजणी झाली. 

प्राथमिक शेती सहकारी संस्था मतदारसंघातून भाजप- शिंदे गटाकडून किरण वासुदेव गावकर २७, सुरेश शांताराम ढवळ २७, अतुल सुभाष दळवी २६, श्रीपत गणपत पाताडे २६, रघुनाथ माधव राणे २६, संजय दत्तत्रय शिरसाट २७ व प्रशांत श्यामसूदर सावंत २६ हे सर्व ही उमेदवार विजयी झाले आहेत.  तर  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून दीपक कांडर ११, रावजी चिंदरकर ११ , राजेंद्र राणे १०, संजय रावले १२, रविकांत सावंत १० व राजेंद्र सावंत १० या सहा उमेदवारांचा पराभव झाला आहे. 

तर इतर प्रकारच्या संस्था मतदारसंघातून एका जागेसाठी शिंदे गटाचे मिथील अशोक सावंत १६ हे विजयी तर शिवसेनेचे श्रीकांत राणे २ अशी मते पडल्याने पराभव झाला आहे. 

व्यक्ती सदस्य प्रतिनिधी गटातून भाजपचे प्रकाश सावंत ३७० मते , गुरूप्रसाद वायंगणकर ३२९ मते  विजयी तर सेनेचे प्रकाश घाडीगावकर २७३ मते व सुभाष सावंत २७० मते यांचा पराभव झाला आहे. 

महिला प्रतिनिधीसाठी भाजपच्या लीना राजन परब ४०४ मते, स्मिता गुरुनाथ पावसकर ३८३ मते विजयी तर सेनेच्या स्वरूपा विखाळे २६९, सुधा हर्णे २६२ मते पडली,त्यामुळे यांचा पराभव झाला.या १८ मते बाद झाली.

इतर मागास प्रवर्गातून भाजपचे सदानंद हळदिवे  ३७३ मते मिळाल्याने यांचा विजय झाला आहे.तर शिवसेनेचे उमेश वाळके ३०८ मते पराभव झाला आहे.१८ मते बाद झाली. 

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून भाजपच्या विनीता बुचडे ३७८ मते मिळाल्याने यांचा  विजय झाला आहे.तर सेनेचे जयेश धुमाळे ३०३ मते मिळाल्याने यांचा पराभव झाला आहे.या मध्ये १४ मते बाद ठरली.

या निवणुकीसाठी सकाळ पासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.यावेळी आ.नितेश राणे, आ.वैभव नाईक यांच्यासह जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते.