भाजपा सिंधुदुर्गच्या 'सेवा पंधरवडा'ची कार्यशाळा

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 11, 2025 20:44 PM
views 13  views

सिंधुदुर्गनगरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान देशभरात सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे .या उपक्रमाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग भाजपा ची या अभियानाची जिल्हा कार्यशाळा गुरवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० - ३० वाजता ओरस सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यालय ( वसंतस्मृती ) येथे झाली. या कार्यशाळेचा शुभारंभ भारत माता , शामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमा पूजन करुन करण्यात आले. 

कार्यशाळेचे प्रास्ताविक व कार्यक्रमाची रुपरेषा अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले .

 राष्ट्रनेता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने स्वच्छता अभियान हे बूथ स्तरावर राबवण्यात येईल.  वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, दिव्यांगाचा सन्मान, विकसित भारत चित्रकला स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या जिवनावर  प्रदर्शनी अशा कार्यक्रमांचे नियोजन बुथ स्तर व मंडल स्तरावर मोर्चा, आघाडी यांच्या माध्यमातून करण्यात येईल. युथ मॅरेथॉनचे आयोजन युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येईल. 

 दिन दयाळ जयंती- २५ सप्टेंबर आणि महात्मा गांधी जयंती- २ ऑक्टोबर हे कार्यक्रम मंडल स्तरावर राबवण्यात येतील ,  सेवाभावी अशा सामाजिक उपक्रमांद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मा.केंद्रीय मंत्री व खासदार नारायणराव राणे व पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनात यशस्वी पणे आयोजित करुया असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले .

 यावेळी या संदर्भातील १४ मंडलात कार्यशाळा सुद्धा १५ सप्टेंबर पर्यत संपन्न होतील असे नियोजन करण्यात आले . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व च्या सर्व १४ मंडलामध्ये सेवा पंधरवड्याचे नियोजन आराखडा तयार झाल्याचे या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सांगितल.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना संघटन मंत्री शैलेंद्र दळवी म्हणाले कि भारतीय जनता पार्टी हा पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष आहे. इतर पक्ष हे निवडणुकीतच जनतेसमोर जातात, परंतु भाजपा कार्यकर्ता वर्षाचे ३६५ दिवस अशा अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात असतो. भाजपाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान बुथ स्तरावर यशस्वी करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. तसेच पदाधिकाऱ्यांना दिलेल्या संघटनात्मक जबाबदारीचा आढावा घेतला .

 यावेळी महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर यांनी " सशक्त नारी अभियान " महीला मोर्चाच्या वतीने राबविणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी व्यासपीठावर युवराज लखमराजे भोसले, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता ताई कोरगावकर , मा.जिल्हाध्यक्ष विजयकुमार मराठे, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग - रणजीत देसाई - संदीप साटम - शारदा कांबळे तसेच जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, संध्या तेरसे‌ उपस्थित होते.

 या कार्यशाळेत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, दिव्यांगांचा सन्मान , क्रीडा स्पर्धा , मान्यवरांचा सत्कार , दिव्यांगांना उपकरणांचे वाटप यांसारखे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवीण्याबाबत नियोजन करण्यात आले .

या कार्यशाळेला भाजपाचे राज्य परिषद सदस्य व जिल्हा विषेश निमंत्रित , जिल्हा व मंडल सेवा सुशासन समिती, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व मंडल महामंत्री, मोर्चा  / आघाडी जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.  कार्यशाळेचा समारोप व आभार जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी मानले.