पोटनिवडणूकीत भाजपाची बाजी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 19, 2023 17:33 PM
views 111  views

सावंतवाडी : आंबोली येथील पोट निवडणूक निकाल पुन्हा भाजपाच्या पदराता पडला आहे. आबोंली माजी सरपंच बाळा पालेकर यांचा रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणूक प्रक्रीयेत भाजपाचे अधिकृत उमेदवार - दिपक रामचंद्र नाटलेकर यांचा 298 मतानी प्रचंड विजय झाला आहे. यासाठी आंबोली येथील संतोष पालेकर व संपूर्ण भाजपा कार्यकत्यांनी मेहनत घेवून हा विजय खेचून आणला. याबद्दल जिल्हाध्यक्ष राजन तेली व माजी नगराध्यक्ष संजू परब, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आनंद नेवगी, मनोज नाईक, केतन आजगावकर यांनी अभिनंदन केले.