
सावंतवाडी : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेत. थोड्याच वेळात नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निमित्ताने सावंतवाडी शहराचा पर्यटन, पर्यावरणपूरक व शास्वत विकासाचा "महासंकल्प" करण्यासाठी त्यांची जाहिर सभा होत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा होत आहे. गांधी चौक, सावंतवाडी येथे ही सभा होत असून भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. थोड्याच वेळात सभेला सुरूवात होणार आहे.










