
वेंगुर्ले : तालुक्यात आज ठिकठिकाणी झालेल्या उपसरपंच निवडीत भाजपाचे प्राबल्य पाहायला मिळाले. १५ ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत भाजपाचे १० उपसरपंच निवडून येत बाजी मारली. या उपसरपंच निवडीच्या घडामोडीत म्हापण येथे अपक्ष सदस्य पदी निवडून येत म्हापण उपसरपंच म्हणून निवडून आलेल्या श्रीकृष्ण लाला ठाकूर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. तर बाळासाहेबांची शिवसेनेना पक्षाकडून भोगवे येथे निवडुन आलेल्या व आता भोगवे उपसरपंचपदी विराजमान झालेल्या माजी सरपंच रुपेश मुंडये यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तालुक्यात आज झालेल्या १५ ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत भाजपाचे १० उपसरपंच निवडून येत भाजप पक्ष पुन्हा एकदा नंबर १ ठरला आहे. तालुक्यात भाजपचे आसोली येथे संकेत संदीप धुरी, परबवाडा येथे विष्णू उर्फ पपु परब, तुळस येथे सचिन नाईक, पाल येथे प्रीती प्रशांत गावडे, वेतोरेत संतोषी सुधीर गावडे, म्हापण येथे श्रीकृष्ण लाला ठाकुर, कुशेवाडा येथे महादेव अनंत सापळे, भोगवेत रूपेश मुंडये हे उपसरपंच निवडीत बिनविरोध तर पालकरवाडी उमा रमेश करांगुटकर व मठ येथे महादेव शिवानंद गावडे बहुमताने विजयी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.