तळेबाजार इथं महालक्ष्मी मंदिराचा ३६ वा वर्धापन दिन सोहळा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 24, 2026 15:51 PM
views 11  views

देवगड : तळेबाजार येथील प्राचीन जागृत देवस्थान श्री देवी महालक्ष्मी मंदिराचा ३६ वा वर्धापन दिन सोहळा  दुर्गाष्टमी दि २६जानेवारी २०२६ ( सोमवार ) रोजी आयोजीत करण्यात आलेला असुन या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . 

यामध्ये सकाळी ७ वा ते ८ .३o वा श्रीदेवी  चरणी एकादशमी ( अभिषेक ) , सकाळी ८ .३०ते १० .३० श्री . सत्यनारायण महापुजा, सकाळी १० वा . बुवा  हर्ष( गोटू ) राणे वरेरी -राणेवाडी यांचे सुस्वर भजन , श्री . अनभव  प्रासादीक भजन मंडळ तळवडे बुवा . कु . अमर कृष्णा अनभवणे , सकाळी ११ वा आरती व तिर्थ प्रसाद सौजन्य संदीप अण्णा धुरी , सकाळी ११ .३० वा . समई नृत्य ( जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा , कुणकेश्वर - कातवण प्रायोजक सुभाष शांताराम धुरी  दु .१२ ते ३ महाप्रसाद ( सौजन्य कै . लक्ष्मी दत्तात्रय गांवकर यांच्या स्मरणार्थ सुधीर दत्तात्रय गांवकर आणि बंधु तळेबाजार ),दु .१ वा . महिलांचा आमने -सामने डबलबारी भजनांचा जंगी सामना बुवा ..सांची मुळम श्री .गजानन प्रासादिक भजन मंडळ पुरळ -हुर्शी विरूद्ध बुवा . कु . भारती पाळेकर श्री देव मालोबा  प्रासादिक भजन मंडळ पाळेकरवाडी यांच्यात रंगणार आहे .( प्रायोजक  मंगेश नारायण धुरी जामसंडे ) रात्री ९वा . फटाक्यांची आतिषबाजी ( सौजन्य दत्त प्रसाद जोईल , रोहीत म्हापसेकर, गोपीनाथ भांबुरे ) रात्री १० . वाजता साई प्रस्तुत ऑर्केस्ट्रा अमर निता प्रेझेन्स सप्तसुर डान्स म्युझिकल नाईट  कोल्हापुर, नाटिका वारसा आयोजीत करण्यात आला आहे.

समस्त धुरी मंडळी, श्री. महालक्ष्मी सेवा मंडळी तळवडे , बागतळवडे , तळेबाजार व श्री.गणेश उत्साही मंडळ आणि ग्रामस्थ, तळेबाजार यांच्यावतीने या मंगल प्रसंगी सर्व भाविकांनी दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.