देवगड आगारात नव्याने दाखल झालेल्या लालपरीचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

Edited by:
Published on: April 04, 2025 16:49 PM
views 157  views

देवगड : देवगड आगारात नव्याने दाखल झालेल्या लालपरीचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले असून, पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने या गाड्या देवगड आगारात नव्याने दाखल झालेल्या आहेत. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, देवगड मंडल अध्यक्ष राजू शेट्ये, मिलिंद साटम, गटनेते शरद ठुकरूल, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेविका प्रणाली माने, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, शक्तीकेंद्र प्रमुख गणपत गावकर, मिलिंद माने, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडकर, तुकाराम देवरुखकर, चंद्रकांत टोणपे, वाहन परीक्षक दिनकर प्रभूमिराशी आदी उपस्थित होते. यावेळी या ७ लालपरी प्रवासी गाड्यांचे स्वागत देवगड तालुका भाजपच्या वतीने तालुका अध्यक्ष राजू शेट्ये यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.