सावंतवाडी भाजप महिला मोर्चाचा मोठा प्रतिसाद

'मन की बात'उत्साहात
Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2023 15:20 PM
views 178  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज (30 एप्रिल) प्रसारित झाला. हा 100 वा भाग आज सकाळी 11 वाजता प्रसारित झाला. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी शहर महिला भाजपन जोरदार तयारी केली होती. महिला शहराध्यक्ष मोहीनी मडगावकर यांच्या प्रयत्नातून हा सोहळा शहरात मोठ्या दिमाखात पार पडला. याप्रसंगी माजी सभापती अँड. परिमल नाईक माजी नगरसेवक उदय नाईक, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होते. तर या सोहळ्याला भाजप महिला मोर्चाचा देखील उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, सविता टोपले, मिसबा शेख, सौ. साळगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला मोर्चा भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.